कार्यासनाबाबत
लेखा शाखेमार्फत पगार देयक, आकस्मिक खर्च देयक, वैद्यकिय देयकांचे प्रस्ताव, विविध अग्रिमाच्या रकमा वितरीत केल्या जातात.
कार्यासनाचे कामकाज
- सहकार आयुक्त कार्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांची वेतनदेयके, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवार्थ प्रणालीमध्ये काढणे.
- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयके, मुख्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके, वैद्यकिय देयके, सहकार आयुक्त कार्यालयाशी संबंधित असलेल्या आकस्मिक खर्चाची देयके आहरित करून वितरीत केली जातात.
- विभागप्रमुख या नात्याने वैद्यकिय देयके मंजूर करणे .
- विभागप्रमुख या नात्याने अधिकारी/कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची परतावा/ना-परतावा अग्रिम मंजूर करणे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांची अंतिम प्रदानाची प्रकरणे मा.महालेखापाल यांना सादर करणे.
- सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेबाबतीत गटविमा योजनांतर्गत प्रस्ताव मंजूर करून सदर रकमा संबंधिताना वितरीत करणे.
- सहकार आयुक्त कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना घरबांधणी/ वाहन/ संगणक/ सण अग्रिम मंजूर करून वितरीत करणे.
- शासनाने उपलब्ध करून दिलेल्या BEAMS प्रणाली मध्ये खर्चाचा हिशोब, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाशी निगडीत राहून खर्च करणे.
- सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत असलेल्या खर्चाचा मासिक खर्च अहवाल तयार करून सादर करणे.
- सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत कर्मचा-यांची वेतन व भत्ते तसेच आकस्मिक खर्च यांचे चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
- मा. महालेखापाल यांनी लेखापरिक्षणामध्ये काढलेले लेखापरिच्छेद सर्व संबंधित कार्यालयांना पाठवून त्यांचेकडून सदरचे परिच्छेद लवकरात लवकर निकाली निघतील याबाबत विभागप्रमुख नात्याने नियंत्रण ठेवणे.