सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

औद्योगिक

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. पांडूरंग खंडागळे 020-26127261
पदनाम अपर निबंधक, (तपासणी व निवडणूका) comm_industry@rediffmail.com
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. पांडूरंग खोडका 020-26122846/7 Ext no.- 245
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था comm_industry@rediffmail.com

कार्यासनाबाबत

औद्योगिक शाखा प्रामुख्याने औद्योगिक सहकारी संस्थांसंर्दभातील कामकाज पाहते. औद्योगिक सहकारी संस्थांना 1:3 प्रमाणात शासकीय भाग भांडवल योजने अतंर्गत औद्योगिक सहकारी संस्थांचे प्राप्त्‍ प्रस्ताव शासनास सादर करणे. तसेच सामुदायिक शेती  सहकारी संस्था, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, साखर आयुक्त, दुग्ध विकास आयुक्त, मत्स्य आयुक्त, संचालक हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग यांचेकडून प्राप्त पत्रव्यहाराचे कामकाज पाहणे.

कार्यासनाचे कामकाज

  • औद्योगिक सहकारी संस्थांची नोंदणी करणेसाठी मार्गदर्शक सूचना, परिपत्रके निर्गमित करणे.
  • औद्योगिक सहकारी संस्थांवरती क्षेत्रीय अधिका-यांमार्फत प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
  • क्षेत्रीय कार्यालयाकडून औद्योगिक सहकारी संस्थांसंदर्भात आवश्यक सांख्यिकी माहिती उपलब्ध करणे.
  • औद्योगिक सहकारी संस्थांसंदर्भात औद्योगिक सहकारी संस्थांना 1:3 प्रमाणात शासकीय भाग भांडवल योजनेसंबंधी सर्व कामकाज पाहणे.
  • महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोदयोग मंडळ, मुंबई यांचेकडून प्राप्त होणा-या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे.
  • अवसायनातील संस्थांचे सांख्यिकी माहितीचे संकलन व तद्नुषंगिक कामे.
  • बहुउद्देशिय सहकारी कायदयासंदर्भातील कामकाज पहाणे.
  • सहकारी संंस्थाच्या शेती संबंधी कामकाज पहाणे.
  • मा. साखर आयुक्त, दुग्ध विकास आयुक्त, मत्स्य आयुक्त, संचालनालय हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग यांचेकडून प्राप्त पत्रव्यहाराचे कामकाज पाहणे.