सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

संघटना व कार्यपद्धती

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. पांडूरंग खंडागळे 020-26127261
पदनाम अपर निबंधक, (तपासणी व निवडणूका)
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. प्रमोद जगताप 020-26122846/7 Ext no.- 234, 236
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था

कार्यासनाबाबत

या शाखेद्वारे मुख्यालयातील सर्व शाखांशी समन्वयाचे कामकाज पाहिले जाते. संगणक शाखेतील माहिती तंत्रज्ञानाचे सर्व कामकाज या शाखेद्वारे पाहिले जाते. सहकार आयुक्त यांचे निर्देशानुसार विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्या आढावा सभा आयोजित केल्या जातात. 

कार्यासनाचे कामकाज

  • मासिक आढावा सभेसाठी विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांचेकडून माहिती प्राप्त करून एकत्रितरित्या सादर करणे. 
  • शासकीय वाहने, फर्निचर, स्टेशनरी, संगणक यांची खरेदी व देखभाल दुरुस्ती करणे.
  • आदिवासी विकास सहकारी संस्था लि. नाशिक यांचे मार्फत आदिवासी सहकारी संस्था यांचे कामकाज, बेरोजगार व स्वयंरोजगार, सर्वसाधारण संस्था, ग्रंथालय इत्यादीचे कामकाज
  • मुख्यालयातील अवजड उपकरणांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
  • मुख्यालयातील इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
  • मुख्यालयातील वाहनांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
  • मुख्यालयातील EPBX, अंतर्गत दुरध्वनी, विद्युत उपकरणे इ. खरेदी व देखभाल दुरुस्ती.
  • मुख्यालयातील दळणवळण संदर्भातील देयकांचे कामकाज
  • राज्यातील अधिनस्त कार्यालयांच्या भाडे मंजुरीबाबत कामकाज
  • राज्यातील अधिनस्त कार्यालयांची व सहकारी संस्थांची तपासणीचे कामकाज
  • महिला तक्रार निवारण समितीचे कामकाज
  • मुख्यालयातील आवक-जावकचे कामकाज