लेखा

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ.पांडूरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (वसुली व नियोजन)
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्रीमती गीतांजली सुपाते 020-26122846/7 Ext no.- 238, 239
पदनाम सहाय्यक संचालक-लेखा (वर्ग-1)

कार्यासनाबाबत

लेखा शाखेमार्फत पगार देयक, आकस्मिक खर्च देयक, वैद्यकिय देयकांचे प्रस्ताव, विविध अग्रिमाच्या रकमा वितरीत केल्या जातात.

कार्यासनाचे कामकाज

  1. सहकार आयुक्त कार्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी  यांची वेतनदेयके,  शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवार्थ प्रणालीमध्ये काढणे.
  2. सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयके, मुख्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके, वैद्यकिय देयके, सहकार आयुक्त कार्यालयाशी  संबंधित असलेल्या आकस्मिक खर्चाची देयके आहरित करून वितरीत केली जातात.
  3. विभागप्रमुख या नात्याने वैद्यकिय देयके मंजूर करणे .
  4. विभागप्रमुख या नात्याने अधिकारी/कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची परतावा/ना-परतावा अग्रिम मंजूर करणे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांची अंतिम प्रदानाची प्रकरणे मा.महालेखापाल यांना सादर करणे.
  5. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेबाबतीत गटविमा योजनांतर्गत प्रस्ताव मंजूर करून सदर रकमा संबंधिताना वितरीत करणे.
  6. सहकार आयुक्त कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना घरबांधणी/ वाहन/ संगणक/ सण अग्रिम मंजूर करून वितरीत करणे.
  7. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या BEAMS प्रणाली मध्ये खर्चाचा हिशोब, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाशी निगडीत राहून खर्च करणे.
  8. सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत असलेल्या खर्चाचा मासिक खर्च अहवाल तयार करून सादर करणे.
  9. सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत कर्मचा-यांची वेतन व भत्ते तसेच आकस्मिक खर्च यांचे चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
  10. मा. महालेखापाल यांनी लेखापरिक्षणामध्ये काढलेले लेखापरिच्छेद सर्व संबंधित कार्यालयांना पाठवून त्यांचेकडून सदरचे परिच्छेद लवकरात लवकर निकाली निघतील याबाबत विभागप्रमुख नात्याने नियंत्रण ठेवणे.