प्रशासन

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. पांडूरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (वसुली व नियोजन)
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. अशोक चाळक 020-26122846/7 Ext no.- 238, 239
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था

कार्यासनाबाबत

या शाखेकडून प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 या कायदयान्वये प्रशासकीय कामकाज केले जाते. सहकार आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील निबंधकास सहकार कायदयाच्या अनुषंगाने परिपत्रकीय सूचना देणे. तसेच, प्रामुख्याने सहकार कायदयातील कलम 77अ, 78, 83,88,102 व 110 अ अन्वये कायदेशीर कारवाईबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील 9 विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडून तिमाही माहिती संकलन करण्यात येते.

कार्यासनाचे कामकाज

  • या शाखेमार्फत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि काही कलमांची वाढ करणे वा कमी करणे याबाबत महाराष्ट्र शासनास शिफारस करणे.
  • बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 च्या कलम 84 चे उपकलम 2 अन्वये सहकारी संस्थांची वसुली, अर्थविषयक बाबी, कायदेशीर विवाद सोडविण्यास लवाद नियुक्ती केली जाते. तसेच, प्रत्येक तिमाहीस लवादाची यादी अदययावत केली जाते.
  • महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मर्या. पुणे व सहकारी प्रशिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवणे.
  • सहकार आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील निबंधकास सहकार कायदयाच्या अनुषंगाने परिपत्रकीय सूचना देणे व निबंधकाच्या मागणीनुसार सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी नोंदणी क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात.
  • माहिती अधिकार अधिनियमानुसार कामकाज करणे.