अंदाज व नियोजन

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. पांडूरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (वसुली व नियोजन)
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. महादेव जाधवर 020-26122846/7 Ext no.- 260, 262, 263
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था

कार्यासनाबाबत

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे मधील अंदाज व नियोजनाचे संपुर्ण कामकाज पाहीले जाते. त्यामध्ये तालुका, जिल्हा,विभाग व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे येथील मुख्यालय इ. कार्यालयांचा समावेश होतो. या शाखेकडुन उपरोक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी /कर्मचारी वर्ग यांचे वेतन ,प्रवास खर्च ,कार्यालयीन खर्च भाडेपट्टी व कर, वाहन दुरुस्ती ,पेट्रोल तेल व वंगन व इतर खर्च यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अनुदान वाटप केले जाते.

त्याच प्रमाणे विविध योजनासाठी लागणाऱ्या खर्चाचे अनुदानाचे वाटप केले जाते. उदा:- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण/विशेष घटक ) औद्योगिक सहकारी संस्थांना भागभांडवली अंशदान उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य.

कार्यासनाचे कामकाज

  • योजनेत्तर बाबी संबंधीत (सर्व मुख्यलेखाशिर्षाचे) चारमाही /आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व शासनास सादर करणे.
  • शासनाकडुन प्राप्त झालेल्या योजना व योजनेत्तर योजनाच्या तरतुदीचे वितरण व नियंत्रण ठेवणे.
  • पुरवणी अंदाजपत्रक तयार करणे व शासनास सादर करणे .
  • योजना व योजनेत्तर योजनेचे वार्षिक खर्चाचा व जमा रक्कमेचा रिपोर्ट तयार करुन शासनास सादर करणे.
  • पंचवार्षिक योजनेचे संकलन कामकाज.
  • वित्त आयोगाला माहिती पुरविणे .
  • क्षेत्रिय कार्यालयाकडुन माहिती संकलित करुन कार्यक्रम अंदाजपत्रक पुस्तिका तयार करणे. (कार्यक्रम अंदाज पत्रक या पुस्तिकेत विभागाच्या कामकाजाची संक्षिप्त माहिती दिली जाते. सदर पुस्तिका अंर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी विधान सभा व विधान परिषदेतील सदस्यांना दिली जाते.)
  • क्षेत्रीय कार्यालयाकडुन जमा व खर्च मासिक अहवाल संकलन व ताळमेळाच्या कामकाजावर नियंत्रण .
  • महालेखापालाना दरवर्षी अहवाल उदा:- विनियोजन वित्तीयलेखे व नागरी अहवाल इत्यादी प्रकाशित करण्यासाठी आवश्यक माहिती या कार्यासनाकडुन पुरवली जाते.
  • लोकलेखा समितीचे संपुर्ण कामकाज (जमा खर्च शिर्षाचे)
  • शासकीय वसुली व उपयोगिता प्रमाणपत्राबाबतचे कामकाज