कार्यासनाबाबत
या शाखेद्वारे मुख्यालयातील सर्व शाखांशी समन्वयाचे कामकाज पाहिले जाते. संगणक शाखेतील माहिती तंत्रज्ञानाचे सर्व कामकाज या शाखेद्वारे पाहिले जाते. सहकार आयुक्त यांचे निर्देशानुसार विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्या आढावा सभा आयोजित केल्या जातात.
कार्यासनाचे कामकाज
- मासिक आढावा सभेसाठी विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांचेकडून माहिती प्राप्त करून एकत्रितरित्या सादर करणे.
- शासकीय वाहने, फर्निचर, स्टेशनरी, संगणक यांची खरेदी व देखभाल दुरुस्ती करणे.
- आदिवासी विकास सहकारी संस्था लि. नाशिक यांचे मार्फत आदिवासी सहकारी संस्था यांचे कामकाज, बेरोजगार व स्वयंरोजगार, सर्वसाधारण संस्था, ग्रंथालय इत्यादीचे कामकाज
- मुख्यालयातील अवजड उपकरणांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
- मुख्यालयातील इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
- मुख्यालयातील वाहनांची खरेदी व देखभाल दुरुस्ती.
- मुख्यालयातील EPBX, अंतर्गत दुरध्वनी, विद्युत उपकरणे इ. खरेदी व देखभाल दुरुस्ती.
- मुख्यालयातील दळणवळण संदर्भातील देयकांचे कामकाज
- राज्यातील अधिनस्त कार्यालयांच्या भाडे मंजुरीबाबत कामकाज
- राज्यातील अधिनस्त कार्यालयांची व सहकारी संस्थांची तपासणीचे कामकाज
- महिला तक्रार निवारण समितीचे कामकाज
- मुख्यालयातील आवक-जावकचे कामकाज