आस्थापना

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. दिनेश ओऊळकर 020-26129572
पदनाम अपर निबंधक, (प्रशासन)
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. प्रशांत सातपुते 020-26122846/7 Ext no.- 220, 221, 265, 222, 223
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था

कार्यासनाबाबत

मुख्यालयातील आस्थापना शाखेमार्फत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संबंधातील मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीकोनातुन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नोंदी व आवश्यक तो तपशिल जतन करुन त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाते.

कार्यासनाचे कामकाज

  • प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी या तारखेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केली जाते या संदर्भात निवेदने प्राप्त झाल्यास त्यावर व्यक्तिश: लक्ष देवून त्याचे निराकरण केले जाते.
  • प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजीकेचे प्रतिवेदन अधिकारी व पुर्नविलोकन अधिकारी यांनी लिहिलेल्या गोपनिय अहवालाचे जतन केले जाते .
  • महालेखापाल,मुंबई यांचेशी योग्य तो पत्र व्यवहार करुन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे हातळली जातात .
  • सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सरळसेवा भरतीच्या पदाचा आढावा घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी नोंदविण्यात येते.
  • विधानसभा व विधानपरिषद यांचेकडून प्राप्त होणाऱ्या तसेच लोकआयुक्त यांचेकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर योग्य ती कार्यवाही केली जाते.
  • एकुण 16 विभागातील ( प्रशासन व लेखापरिक्षण )अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकातील नोंदी वेळोवेळी घेण्यात येतात व त्यांचे जतन केले जाते. (प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसह)
  • एकुण 16 विभागातील ( प्रशासन व लेखापरिक्षण )अधिकाऱ्यांच्या रजा या कार्यालयामार्फत मंजुर केल्या जातात.
  • एकुण 16 विभागातील ( प्रशासन व लेखापरिक्षण )अधिकाऱ्यांच्या दरवर्षी आवश्यकते नुसार वेतन निश्चिती केली जाते.
  • सर्व प्रतिनियुक्तीवरील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांच्या बदली व तत्सम बाबी संदर्भात कार्यवाही केली जाते.
  • सर्व वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांनी शासनास सादर केलेल्या मत्ता व दायीत्व विषयक बाबीवर आवश्यक ती कार्यवाही केली जाते.
  • मराठी हिंदी व एमएससीआयटी परिक्षासंदर्भातील व सदर परिक्षेतून सुट मिळणे संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाते.
  • सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाते.
  • महाराष्ट्र शासन व मा.आयुक्त यांचे विरुध्द मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,मुंबई,औरगांबाद व नागपूर येथे दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरण संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाते.
  • राज्यातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या विभागीय बदल्या,आंतर विभागीय बदल्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाते. तसेच मुख्यालयाच्या स्तरावरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांचे पदोन्नती, सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करणे,अनुकंपातत्त्वावरील भरती करणे,गोपनिय अहवालावर योग्य ती कारवाई त्याचे जतन करणे व रजा मंजुर करणे इत्यादी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाते.